Ad will apear here
Next
‘एन्थुजिया’च्या विजेतेपदावर ‘सिम्बायोसिस’ची मोहोर
‘एन्थुझिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांसह मान्यवर

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील एकूण ४० महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला. 

गायन, वादन, नृत्य या कलांच्या बहारदार सादरीकरणासोबतच बुद्धीला चालना देणाऱ्या विविध स्पर्धांनी ‘एन्थुजिया २०१९’ महोत्सवात रंगत आणली. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्स क्रीडा, स्कॅव्हेंजर हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अशा एकूण १८ प्रकारचा समावेश असतो. यंदा पुण्यातील ४० महाविद्यालयांच्या एकूण ७५० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.

‘एन्थुजिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्र-कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरुप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली साने, बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील कुमार बन्सल, सुनील देव, ‘एन्थुजिया’च्या समन्वयक आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, विभागप्रमुख प्रा. सुमिता जोशी, विभागप्रमुख प्रा. हेमंत भिसे, सहसमन्वयिका प्रा मृदुल वैद्य, विद्यार्थी समन्वयक सोहम लांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राहुल कराड म्हणाले, ‘एन्थुजिया महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभ्यासासोबत विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विविध क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’

डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, ‘कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ‘एन्थुजिया’ महोत्सव वर्षातून दोनदा आयोजिला जातो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTPCE
Similar Posts
पुण्यात घुमणार ‘स्वरझंकार’ पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व व्हायोलिन अकादमीतर्फे १० ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत कोथरूड येथील एमआयटीच्या मैदानावर स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७० वर्षांच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा लाभलेल्या व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित या महोत्सवाचे हे १० वे वर्ष आहे,’ अशी माहिती
शिवांजली डान्स अॅकॅडमीच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद पुणे : शिवांजली डान्स अॅकॅडमीचा दहावा वर्धापनदिन जेष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती बर्‍हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे १० मार्च २०१९ रोजी साजरा करण्यात आला.
‘पुण्याने मला मोठे केले’ पुणे : ‘मला पुण्याने मोठे केले. मी माशेलकर नसून पुणेकरच आहे. या पुण्याने माझे लाड केले आणि वाढविले. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत पुण्यातच राहीन,’ अशी कृतज्ञतेची भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. ‘‘फेल’ म्हणजे ‘फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.’ अहोरात्र मेहनत आणि
एमसीई सोसायटीतर्फे चार कला शिक्षकांचा गौरव पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्टस’च्या वतीने ‘१७ व्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे’ निमित्त ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९’चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी भारतीय रुपयाच्या नव्या डिझाईनचे डिझायनर डॉ. उदय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language